Saturday, September 21, 2019

मंदी - डोळे उघडणारा लेख

* मंदी * ??  हा डोळे उघडणारा लेख वाचाच...

बनवारीलाल एक समोसा विक्रेता होता.  तो आपल्या परिसरातील एका गाडीवर दररोज 500 समोसे विकत असे.  लोकांना गेल्या 20 वर्षांपासून त्याचे समोसे आवडत असत, कारण तो उत्पादन व विक्रीमध्ये स्वच्छता राखत असे, दर्जेदार तेल आणि इतर साहित्य वापरत असे, समोश्याबरोबर चटणी मोफत देत असे.  तो सर्व न विकले गेलेले समोसे गरीब लोक, गायी व भटक्या जनावरांना  देत असे परंतु दुसर्‍या दिवशी ग्राहकांना शिल्लक समोसे विकत नसे.
 
बनवारीला समोसा विक्रीतून चांगली प्रतिष्ठा व पैसा मिळाला आणि 15 वर्षात त्याची विक्री कधीच कमी झाली नाही.  आपल्या कमाईतून त्याने एका खासगी महाविद्यालयात आपल्या मुलाला एमबीए शिकविले.
 
त्याचा मुलगा रोहितने एमबीए पूर्ण केले आणि योग्य प्लेसमेंट मिळत नसल्याने घरी आला.  रोहितने वडिलांच्या समोसा व्यवसायात रस घ्यायला सुरुवात केली.  त्याला समोसे विक्री नित्कृष्ट काम वाटल्यामुळे त्याने यापूर्वी वडिलांच्या व्यवसायात रस घेतला नव्हता.
 
एमबीए दरम्यान रोहितने मंदीवर बरेच काही वाचले होते. त्यांनी वाचले होते की जागतिक अर्थव्यवस्थेत प्रगती होत आहे आणि यामुळे नोकऱ्या मिळण्यावर कसा परिणाम होईल, बेरोजगारी कशी वाढेल इत्यादी.

म्हणून त्यांने विचार केला की मंदीच्या पार्श्वभूमीवर समोसा विक्रीवर होणाऱ्या परीणामाबद्दल आपल्या वडिलांना सल्ला द्यावा.
 
त्याने आपल्या वडिलांना सांगितले की मंदीमुळे समोश्याची विक्री कमी होऊ शकते, म्हणून नफा राखण्यासाठी खर्च कमी करण्याची तयारी ठेवावी.
 
बनवारीला आनंद झाला की त्याचा मुलगा आपल्या व्यवसायात रस घेत आहे, त्याला बरेच काही माहित आहे. आपल्या मुलाचा सल्ला मानण्यास तो कबूल झाला.
 
दुसर्‍या दिवशी रोहितने 20% वापरलेले तेल आणि 80% ताजे तेल वापरण्याची सूचना केली.  लोकांना चवीतील बदल लक्षात आला नाही आणि 500 ​​समोसे विकले गेले.
 
या बचतीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे रोहित खुश झाला.  पुढच्या आठवड्यात त्याने वापरलेल्या तेलाचे प्रमाण 30% करण्याचे आणि मोफत चटणीचे प्रमाण कमी करण्याचे सुचविले.
 
त्या आठवड्यात केवळ 400 समोसे विकले गेले आणि 100 समोसे गरीब लोकांना देण्यात आणि कुत्र्यांना टाकण्यात आले.

रोहितने त्याच्या वडिलांना सांगितले की त्याने  सांगितल्यानुसार मंदी खरोखरच येत आहे, त्यामुळे खर्चात जास्त कपात करावी लागेल आणि ते शिळे समोसे फेकणार नाहीत तर दुसर्‍या दिवशी पुन्हा तळून विक्री करतील.  वापरलेल्या तेलाचे प्रमाण देखील 40% पर्यंत वाढविले जाईल आणि वाया जाऊ नयेत म्हणून फक्त 400 समोसे बनवले जातील.

तिसऱ्या आठवड्यात 400 समोसे विकले गेले परंतु ग्राहकांना  जुनी चव जाणवत नव्हती.  पण रोहितने आपल्या स्मार्ट प्लॅनिंगमुळे होणाऱ्या बचतीबद्दल वडिलांना सांगितले.  वडिलांनी  विचार केला की कदाचित तो चांगला शिकला असेल.
 
चौथ्या आठवड्यात रोहितने 60 % तेल वापरण्याचा निर्णय घेतला, गोड चटणी काढून फक्त हिरवी चटणी दिली, 400 समोसे बनवले.  त्यादिवशी केवळ 300 समोसे विकले जाऊ शकले कारण लोकांना चव आवडली नाही.
 
रोहितने वडिलांना सांगितले, "पहा, मी म्हणालो होतो की मोठा मंदी येईल आणि विक्री घसरेल. आता हे घडत आहे. आपण हे 100 शिळ्या समोसे टाकून देणार नाही तर उद्या तळून विकू."  वडिलांनी त्याच्या एमबीए मुलाशी सहमती दर्शविली.
 
पुढच्या आठवड्यात, 200 ताजे समोसे 50% वापरलेल्या तेलासह बनविले गेले, 100 शिळे तळलेले समोसे विक्री करण्यात आले, परंतु दर्जा कमी झाल्यामुळे केवळ 200 विकले जाऊ शकले.
 
रोहित म्हणाला की खरोखरच मंदी आली आहे आणि आता लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत म्हणून त्यांनी फक्त 100 समोसे बनवावेत आणि 100 शिळ्या समोसेची परत तळून विक्री करावी आणि पेपर नॅपकीन देणे थांबवावे.
 
नंतरच्या आठवड्यात फक्त 50 समोसे विकले गेले.
 
रोहितने आपल्या वडिलांना सांगितले की, "आता मंदीने ग्राहकांना ग्रासले आहे. लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे ह्या व्यवसायात तोटा होईल आणि त्यामुळे  समोश्याची विक्री बंद करावी आणि दुसरा व्यवसाय करावा."
 
आता त्याचे वडील चिडले, "मला माहित नव्हते की ते एमबीएच्या नावाखाली फसवणूक शिकवतात. तुमचे एमबीए शिक्षण घेण्यात माझे पैसे गमावले. समोसा विक्रीच्या गेल्या 20 वर्षात मला कधीच मंदी नव्हती पण नफ्यासाठी माझा धंदा बंद पडला. तू माझ्या व्यवसायातून बाजूला हो, मी तो परत पूर्वपदावर आणीन. मी तुला प्लेट विसळण्याचे काम देऊ शकतो कारण एमबीए शिक्षित असूनही आपण फक्त हेच करू शकता. "
 
त्यानंतर, बनवारीने आपल्या अनुभवाचा आणि व्यवसायाच्या योग्य पद्धतींचा अवलंब करण्यास सुरवात केली.  एका महिन्यातच त्याची विक्री 600 समोश्यापर्यंत पोहोचली.
 
* मंदीची कारणे -

१. अधिक कर संकलनाचा सरकारचा हव्यास.. कारण कोणत्याही परिस्थितीत वेतन आयोग व महागाई भत्ता मागणारे व संप करणारे आडमुठे सरकारी कर्मचारी..

२. गुणवत्ता कमी करून आणि अयोग्य पद्धती वापरुन नफा मिळवण्याची मोठ्या उद्योगांची हाव..

  आणि

३. जोपर्यंत नफ्यात आहे तोपर्यंत नित्कृष्ट सेवा देणारे निष्काळजी कर्मचारी.

व्यवसाय आणि सरकारला त्यांच्या खर्चावर मर्यादा घालून दिलेली शिक्षा म्हणजे मंदी.

No comments:

Post a Comment